कुडाळ पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई अजितकुमार बाळकृष्ण पाटील याची आत्महत्या
कुडाळ पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई अजितकुमार बाळकृष्ण पाटील (वय 42, सध्या रा. कुडाळ – कुडाळेश्वरवाडी, मूळ रा. वाळवा, जि. सांगली) यांनी कुडाळ येथील प्लॅटमध्ये विष प्राशन केले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी पडवे येथे हलविण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान रविवारी रात्री 11.30 वा.च्या सुमारास मृत्यू झाला. कौटुंबिक कारणातून पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
www.konkantoday.com