सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण मृत्यू दर वाढीला पालकमंत्री जबाबदार -भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्ष म्हणून गेले वर्षभर कोरोना कालावधी असल्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली. मात्र या काळात देखील सत्ताधाऱ्यांनी कोरोना वर मात करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम केलेली नाही. जिल्ह्यात पीएम केअर मधून आलेले व्हेंटिलेटर अद्याप जोडलेले नाहीत.जिल्हा रुग्णालयात फिजिशियन नाही, परिचारिकांनी आंदोलन केलं,त्यामुळेच वास्तव जनतेसमोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा पर्दापाश झालेला आहे. येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारीयांची भेट घेऊन सगळ्या गोष्टींची माहिती देवू, त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हा प्रशासन व सत्ताधार्यांच्या विरोधात आरोग्य व्यवस्थेसाठी आंदोलन करेल. जिल्ह्यात कोरोना रुग्ण मृत्यू दर वाढीला पालकमंत्री जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
www.konkantoday.com