
योगगुरू रामदेव बाबांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कठोर शब्दात सुनावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले
अँलोपॅथीला ‘फालतू विज्ञान’ म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कठोर शब्दात सुनावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
“हे विधान मी मागे घेत आहे आणि या वादावर पडदा टाकत आहे,” असे ते म्हणाले.
रामदेव बाबांनी अँलोपॅथीला फालतू विज्ञान म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशनने नोटीस बजावली होती तर आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यावर नाराजी व्यक्त केली होती.
त्यांच्या पत्राला उत्तर देताना स्वामी रामदेव म्हणाले आहेत की “मी सर्व उपचार पद्धतींचा आदरच करतो.कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी आपली जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले या गोष्टीचा मला आदरच आहे.
“काही डॉक्टर्स देखील नॅच्युरोपॅथी आणि आयुर्वेदाला स्युडो सायन्स म्हणतात, त्यांनी देखील अशी वक्तव्य टाळावीत,” असे रामदेव बाबांनी म्हटले आहे
www.konkantoday.com