
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत मासेमारी दि.१ जून पासून बंद ठेवण्यात येणार
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत मासेमारी दि.१ जून पासून बंद ठेवण्यात येणार आहे. मासेमारी बंदीचा कालावधी दि.१ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) निश्चित करण्यात आला आहे.
मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालूवर्षी दि.१ जून ते ३१ जुलैपर्यंत सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.
सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ कलम १४ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com