
बेकायदेशीर रिसोर्ट प्रकरणी भा.ज.पा माजी खासदार डॉ.किरीट सोमय्या यांनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट
पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे बांधकाम करून CRZ चे उल्लंघन, फसवणूक व मंत्रीपदाचा दुरुपयोग करून मुरुड ता.दापोली जि.रत्नागिरी येथील साई रिसोर्टचे बांधकाम केल्याप्रकरणी माजी खासदार डॉ.किरीट सोमय्या यांनी सोमवार दि.२४/०५/२०२१ रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांची भेट घेत याप्रकरणी चौकशी करण्याचे निवेदन दिले. डॉ.किरीट सोमय्यांबरोबर यावेळी भा.ज.पा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन,शहराध्यक्ष श्री.सचिन करमरकर, नगरसेवक श्री.उमेश कुलकर्णी उपस्थित होते.
मुरुड ता.दापोली येथे गट क्र.४१६ वर साई रिसोर्ट २०२० मध्ये बांधण्यात आला. पालकमंत्री अनिल परब यांनी आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करून खोटे बनावट कागदपत्र सादर करून हा रिसोर्ट उभा केला आहे. ॲड.अनिल परब यांनी काही अधिकाऱ्यांच्या सहमतीने फसवणूक करून हा रिसोर्ट बांधला. त्यामुळे बेकायदेशीर रिसोर्ट ताबडतोब तोडण्यात यावा तसेच अनिल परब यांनी सरकारी दस्तऐवजात खाडाखोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी डॉ.किरीट सोम्मया यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. तसेच जे अधिकारी यामध्ये भागीदार झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. CRZ कायद्याची पायमल्ली खारफुटी, कांदळवने पाडल्याबद्दल ही श्री.अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी डॉ.किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
www.konkantoday.com