
किल्ले रत्नदुर्गवर दसरा गडपूजन सोहळा
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या रत्नागिरी विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर किल्ले रत्नदुर्गवर दसरा गडपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या (२ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता किल्ले रत्नदुर्गवरील हनुमान मंदिर, महादरवाजा येथे “आधी तोरणं गडाला… मग घराला” या विचाराने दसरा गडपूजन केले जाणार आहे.
गड हे केवळ दगडांचे बांधकाम नाहीत, तर आपल्या इतिहासाचे, स्वाभिमानाचे आणि शौर्याचे जिवंत प्रतीक आहेत. म्हणूनच या पवित्र गडाच्या साक्षीने पार पडणाऱ्या या सोहळ्याला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून गडपूजनाची शोभा वाढवावी. तसेच अधिक माहितीसाठी 9920905920, 7666708201, 8379012347 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




