
आज सोमवारी देशभरातील वीज कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार
वीज मंडळातील विविध विभागांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना शासनाने फ्रंटलाईनचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आज सोमवारी देशभरातील कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
वीज कर्मचारी, अभियंते यांच्या संघटना कृती समितीने हा निर्णय जाहीर केला असून, वीज महामंडळाने कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांच्या संयुक्त कृती समितीची बैठक 15 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यानुसार महामंडळाच्या सर्व विभागात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी व अभियंत्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा. मेडिक्लेम योजनेत परस्पर नेमलेला टीपीए तत्काळ बदल करावा, अशी मागणी शासनाकडे केली होती.
www.konkantoday.com