संशोधन आणि विकास संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प
देशाच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे.
हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय आणि एचएलएल इन्फ्राच्या वतीने करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, खेड आणि रत्नागिरीमध्ये असेच आणखी तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे रहाणार आहेत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील रुग्णालयांमध्ये वैदकीय प्राणवायूचा तुटवडा तीव्रपणे भासू लागला. त्यामुळे या महामारीची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यात प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.
www.konkantoday.com