रत्नागिरी शहरात निकृष्टरित्या थातूर मातूर डांबरीकरण पट्टे करण्याच्या कामाला समविचारी मंचचा विरोध
*रत्नागिरी शहरातील अनेक ठिकाणी सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली भर रस्त्यांची उखळपाखळ करुन वाताहात करण्यात आली आहे.काही ठिकाणी निविदाच्या नियम शर्ती अटींना फाटा देत निकृष्टरित्या थातूर मातूर डांबरीकरण पट्टे ओढण्यात येत आहेत.याची देखरेख रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी,नगर अभियंता करीत नाहीत.सबंधित ठेकेदार ‘किती जणांचे भागवायचे की काम करायचे’ ? असे चोख बोलू लागल्यामुळे सुधारणा कामाविषयी संशयाचे धागे निर्माण झाले आहेत.
आज कितीतरी नागरिकांनी समविचारी मंच कडे संपर्क साधून हे जे काही चाललेय ते बघा म्हणून सांगत आहेत
यातील नमुना दाखल उदाहरण म्हणून गुळगुळीत रस्ते करण्याची भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्यांनी माळनाका,आरोग्य मंदिर संकेश्वर नगर भागात बघावे.येथील काम अर्ध्या तासात पुरे झाले.तीन डंपर खडी आली.बस.पसरली गेली.हे सहन झाले नाही म्हणून लोक रस्त्यावर उतरले.इंजिनियर कोणीतरी डांगे यांना फोन लावण्यात आला.ते गडबडीत होते.येतो म्हणून आले नाहीत.रस्त्याचे डांबरीकरण 20MM खडीने व्हायला हवे असे वर्क आँर्डर मध्ये नमूद असतांना तसे केले गेले नाही.शेवटी समविचारीच्या जबाबदार पदाधिका-यांनी लोकांच्या सह्या घेतल्या आणि सर्व काही कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याचे जाहीर केले आणि उपस्थितांना समजावून घरी पाठविले.सामाजिक सुरक्षाचे पालन करुन त्या त्या परिसरातील नागरिकांनी स्वतःहून धाव घेतली होती.
आता रत्न्रांगीकर जागृत झाले असून त्यांना महाराष्ट्र समविचारी मंच हा आधार मिळाला आहे.नियमांचे पालन करीत योग्य मार्गाने न्याय मागण्याची समविचारींची पद्धत जनतेला पटू लागली आहे असे मत समविचारी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे
www.konkantoday.com