
मदतीसाठी हात आखडता न घेता सढळ हाताने मदत करण्याची सरकारची भूमिका -पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
तोक्ते’ वादळामुळे मालवणसह वेंगुर्ले, देवगड तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत. घरांच्या नुकसानीचे पंचनाने पूर्ण होत आले असून फळबागायतींचे पंचनामेही दोन-चार दिवसांत पूर्ण होतील. मदतीसाठी हात आखडता न घेता सढळ हाताने मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवबाग येथे बोलताना दिले.
www.konkantoday.com