कोरोनाच्या काळात पोलीस कोरोनामुक्त रहावेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांचे विशेष प्रयत्न,दुसऱ्या लाटेत पोलीस कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक असला तरीही पोलिसांचे तातडीने झालेले लसीकरण यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर योगा, प्राणायाम हेही केले जात असल्याने पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत पोलीस कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा कमी झाले आहे.
पहिल्या लाटेत १९ पोलीस अधिकारी आणि १९७ कर्मचारी बाधित झाले होते. मात्र, दुसऱ्या लाटेपूर्वीच पोलिसांचे लसीकरण सुरू झाले. पहिला डोस ९६ टक्के तर दुसरा डोस ९० टक्के पोलिसांना देण्यात आल्याने बाधित होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत २ अधिकारी आणि ६२ कर्मचारी बाधित झाले असले तरीही त्यांच्यापैकी बहुतांश जणांना सौम्य लक्षणे होती.
कोरोनाच्या काळात पोलीस कोरोनामुक्त रहावेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत सध्या पोलिसांचे मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम करून घेतले जात आहे. दुसऱ्या लाटेत खबरदारी म्हणून पोलिसांना आर्सेनिक गोळ्या, वाफेचे मशीन, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझर तसेच ऑक्सिमीटर, थर्मामीटर दिले आहेत
www.konkantoday.com