कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के

पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे.
कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात हा सौम्य धक्का जाणवला. यामुळे कोणतीही हानी किंवा धोका निर्माण झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे
www.konksntoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button