शाळा भरली नसेल तर संस्थेने विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय करू नये -उपमुख्यमंत्री अजित पवार
शाळा सुरू नसतानाही शिक्षण संस्थांकडून फी आकारली जात आहे. यासंदर्भात समन्वयाने मार्ग काढू. शाळा भरली नसेल तर संस्थेने विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय करू नये. याबाबत संबंधित विभागाशी बोलून मार्ग काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शासनसेवेतील अधिकाऱयांच्या पदोन्नतीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्याच्या अॅडव्होकेट जनरलचे मत घेऊन शासन निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com