
पाटगाव पठारवाडीत साडीने पेट घेतल्याने वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू.
साडीने अचानक पेट घेवून भाजलेल्या देवरूख तालुक्यातील पाटगाव पठारवाडी येथील चंद्रभागा शंकर खेडेकर (८०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.चंद्रभागा खेडेकर या १ एप्रिल रोजी आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना शेकोटी घेत होत्या. अचानक त्यांच्या साडीने पेट घेतल्याने त्या गंभीररित्या भाजल्या. तत्काळ त्यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरू असताना १३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पठारवाडीही येथील त्यांच्या निवासस्थानी आणले गेले. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.www.konkantoday.com