राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या १२ सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात?मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारणा
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२आमदारांच्या नियुक्तीच्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारलाय. राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या १२ सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवांनाच प्रश्न केल्यानं याबाबत आता हालचाल होण्याची शक्यता निर्माण झालीय
www.konkantoday.com