माजी सचिवांच्या ओंजळीने सरकार पितय पाणी- आमदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप
माजी सचिवांच्या ओंजळीने सरकार पाणी पित आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री कोकणात आले पण वादळातील आपद्ग्रस्तांना मदत जाहीर करु शकले नाहीत, असा आरोप भाजपचे माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तौक्ते चक्रीवादळाने बाधित झालेल्यांना दिलासा देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली नाही यावरुन भाजपकडे सत्ताधार्यांसह मुख्यमंत्र्यांवर कडाडून टिकास्त्र सोडले जात आहे.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आदी उपस्थित होते.
या वेळी श्री. चव्हाण म्हणाले, तौक्ते चक्रीवादळाने कोकणातील जिल्हे बाधित झाले आहेत. विरोधी पक्षनेते तिन दिवस कोकण दौर्यावर होते. त्यांचा दौरा जाहीर झाला आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोकणात आले. कोकणातील लोकांना त्वरीत मदतीची अपेक्षा होती; परंतु त्यांनी पूर्णतः निराशा केली. आपत्ती आल्यावरं सर्वात प्रथम तातडीच्या मदतीची गरज असते. सरकार मायबाप असल्यामुळे सामान्यांना त्याची गरज असते. पंचनामे होतच असतात. आज मुख्यमंत्र्यांनी चार तासाचा दौरा केला. त्या तुलनेत च्रकीवादळ जास्त काळ कोकणात घोगावत होते. पहिल्यांदा असे झाले आहे, मुख्यमंत्री आले आणि त्यांनी मदत जाहीरच केली नाही. मदत जाहीर करायचीच नव्हती तर हा दौर्यांचा अट्टाहास कशाला. कोकणातील लोकांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी.
यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर मुख्य सचिवही होते. पण माजी सचिव अजय मेहता यांचा सल्ला न घेतल्यामुळे मदत जाहीर करण्याचे धाडस केले नसावे.
वादळामुळे सामान्य लोकांची स्थिती गंभीर आहे. पण मुख्यमंत्री जिथे गेले तिथे रेड कार्पेट अंथरलेले होते. या परिस्थितीत हा जामा निमा योग्य आहे का. यावेळी कोकणवासीयांना सहानुभूतीशिवाय दिलय काय. आंबा व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ते भरुन काढणे गरजेचे आहे. माजी सचिवांवर अवलंबून राहू नका, लोकांना जे पाहीजे ते द्या. एखादी गोष्ट बोलत बोलत कुठेतरी न्यायची ही महाविकास आघाडीतील नेत्यांची खासीयत आहे. राजकारण करा पण ते लोकांच्या भल्यासाठी असले पाहीजे. फक्त केंद्राकडे बोट दाखवत राहू नका. राष्ट्रीय महामार्गाजवळील बाधित झाडांना ज्या पध्दतीने भरपाई दिली गेली. त्याच पध्दतीने कोकणात नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना दिली पाहीजे, अशी सूचना माजी मंत्री चव्हाण यांनी केली.
www.konkantoday.com