धोपावे, वेलदूर, साखरीत्रिशुळ या गावांना आरजीपीपीएल कंपनीमार्फत पाण्याचा टँकर सुरू
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या सूचनेनंतर तालुक्यातील धोपावे, वेलदूर, साखरीत्रिशुळ या गावांना आरजीपीपीएल कंपनीमार्फत पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमधील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
विक्रांत जाधव हे गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पाणी टंचाईबाबत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक झाली होती.
www.konkantoday.com