दहावी परीक्षेबाबत पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ,-उपमुख्यमंत्री अजित पवार
दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करू शकता, करोनाचे कारण पुढे करून दहावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षाची परीक्षा रद्द कशी के ली जाऊ शकते, बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?, अशी सरबत्ती करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी फटकारले होते.
www.konkantoday.com