तौक्ते चक्रीवादळात रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती

नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात जिल्हयात 2 जणांचा मृत्यू झाला असून 9 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या 11 आहे.जिल्हयात 17 घरे पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित घरांची संख्या 7865 आहे. यात सर्वाधिक दापोलीत 2466 आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1109 तर राजपूरातील 893 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठयांची जिल्हयातील 446 इतकी आहे.
या व्यतिरिक्त दोन झोपड्यांचे नुकसान झाल्याची ताजी माहिती प्राप्त झाली आहे संगमेश्वर येथील एक व रत्नागिरी येथील एक झोपड्या पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत
वादळात वाऱ्यामुळे 1042 झाले पडली. यात सर्वाधिक 792 झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या 250 इतकी आहे
चक्रीवादळात 60 दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यामधील आहेत.
चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचे या साधारण 2500 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यातील 5709 शेतकऱ्यांच्या 1278.5 हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.
चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे.
बाधित उपकेंद्राची संख्या 55 व फिडरची संख्या 206 आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे 485 खांब बाधित झाले असून यापैकी 125 पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या 1233 इतकी आहे. यातील 133 खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.
जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी 3 बोटी पूर्णत: तर 65 बोटींचे अशंत: नुकसान झाले. 71 जाळयांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजीत नुकसान 1 कोटी रुपयांपर्यंत आहे.
या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे 1कोटी 98 लाख 84 हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button