
आंबेड-सोनगिरी दोन बहिणींचा अविस्मरणीय पालखी भेट सोहळा
आंबेड बु, कानरकोंड, मानसकोंड गावची ग्रामदेवता त्रिमुख-अंत्राळ देवी व कोळंबे-सोनगिरी गावची ग्रामदेवता कोळंबे सोनगिरी गावाची ग्रामदेवता महालक्ष्मी, जुगाई, चंडिका, वाघजाई, त्रिमुख या दोन बहिणींचा अविस्मरणीय पालखीभेट सोहळा पार पडला.
हा सोहळा पाहण्यासाठी परचुरी, कोळंबे, मानसकोंड, वांद्री, उक्षी, सोनगिरी, कुरधुंडा, पांगरी, बावनदी या ठिकाणाहून अनेक भाविक उपस्थिती दर्शवतात. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आंबेड येथील होमामध्ये नारळ टाकण्यासाठी नवीन जोडपी येतात. पालखी होमाला पाच प्रदक्षिणा घालून होम पेटवला जातो. त्यावेळी पालखी होम आणि माड यांना धावत प्रदक्षिणा घालते. हा सोहळाही पाहण्यासारखा असतो. माहेरवाशिणीसाठी पावणारी देवी अशी ख्याती अंत्राळ देवीची आहे. या देवीला अनेक लोक दूरवरून नवस बोलतात आणि ते पावतात असेही भाविकांचे म्हणणे आहे.