गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे व्हेंटिलेटर मशीन अद्यापही बंद
गुहागर ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, हे मशीन अद्याप कार्यान्वितच करण्यात आले नसल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. जयंत दाभाेळे यांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यावेळी तांत्रिक बाबींमुळे व्हेंटिलेटर मशीन सुरू झाले नसल्याची माहिती देण्यात आली.
www.konkantoday.com