
कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेसच्या आमदारांच्या निधीतून १११ अँम्ब्युलन्स देण्यात येणार
कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेसच्या आमदारांच्या निधीतून १११ अँम्ब्युलन्स देण्यात येणार असून तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेसने विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. राज्यातील जनतेला आमदार निधीतून अँम्ब्युलन्स देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना पत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील लोकांना ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यानिमित्ताने दिली.
www.konkantoday.com