
आपल्याकडे लसींचा किती साठा व जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी काय आहेत हे न पाहता, केंद्र सरकारने वेगवेगळ्या वयोगटासाठी लसीकरण सुरु केल्याने लसीचा तुटवडा
आपल्याकडे लसींचा किती साठा आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी काय आहेत हे न पाहता, सरकारने वेगवेगळ्या वयोगटासाठी लसीकरण सुरु केलं आहे असा आरोप पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केलाय. देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्याचं जाहीर केलं असताना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरणातील दुसऱ्या टप्प्यातील ४५वर्षावरील लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागतीय अशी परिस्थिती निर्माण झालीय.
www.konkantoday.com