
लोन देण्याचे आमिष दाखवून खेडमधील इसमाची दोन लाख सदतीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक
सध्या खेड वेरळ येथील(मूळ रा पाथर्डी अहमदनगर) राहणारे सुधाकर महादेव बडे यांची अज्ञात इसमाने
लोन मंजूर करण्याचे आमिष दाखवून त्यांची दोन लाख सदतीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे
यातील फिर्यादी सुधाकर बडे यांना अज्ञात इसमाने मोबाइलवर फोन केला
हिंदी भाषेतून बोलणाऱ्या या इसमाने फिर्यादी यांना मी तुम्हाला एसबीआय युनाेमार्फत लोन मिळवून देतो असे सांगितले त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसल्याने त्यांनी आपल्या एसबीआय बँक पाथर्डी अहमदनगर या खात्याचा युजर आयडी पासवर्ड ओटीपी समोरील इसमाला दिला ओटीपी प्राप्त होताच समोरील अज्ञात इसमाने बडे यांच्या खात्यामधील दोन लाख सदतीस हजार रुपये रक्कम काढून घेऊन त्यांची फसवणूक केली फिर्यादी बडे यांनी खेड पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com