वादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी आलो आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलो नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी आलो आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलो नाही. मी जास्त फिरत बसण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करतो असे सांगत, हेलिकॉप्टरमधून नव्हे तर जमिनीवरून मी पाहणी करतोय. फोटोसेशन करायला आलेलो नाही. अशी टोलेबाजी विरोधकांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना केली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणावर कोरोना आणि वादळ दुहेरी संकट ओढावले आहे. असे मत त्यांनी व्यक्त करत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. तसेच, दौऱ्यादरम्यान, विरोधकांचादेखील समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी प्रथम रत्नागिरी जिल्ह्याला आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोकणावर कोरोना आणि वादळ दुहेरी संकट ओढावले आहे अशी खंत व्यक्त केलीपंचनामे पुर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार. तसेच, कोणत्या निकषानुसार मदत जाहिर करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला
कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.
www.konkantoday.com