
सह्याद्रीतील वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर-डॉ. शरद आपटे
वाढते प्रदूषण, तापमान व मानवी हस्तक्षेपामुळे सह्याद्रीतील काही दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या वनस्पतींचे जतन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डीबीजे महाविद्यालयाच्या कोकण विभागातील औषधी वनस्पती या विषयावरील कार्यशाळेत वनस्पती तज्ज्ञ डॉ. शरद आपटे यांनी केले
ते म्हणाले, पश्चिम घाट अर्थात सह्याद्री हा जगातील सर्वात जास्त जैवविविधता असलेल्या आठ जागांपैकी एक आहे. इतर दुर्मिळ सजीवांसोबत येथे मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आढळतात. या वनस्पतींचा दैनंदिन जीवनात फार मोठा उपयोग होतो. वेगवेगळ्या रोगांवर या वनस्पती अतिशय गुणकारक आहेत. आधुनिक शास्त्र या औषधी वनस्पतीचा उपयोग औषधनिर्मितीसाठी करतात. अन्न, वस्त्र, निवारा, प्राणवायू, सुगंधी द्रव्य, सौंदर्यप्रसाधन आणि वेगवेगळ्या असाध्य रोगांवर या वनस्पती गुणकारक औषध म्हणून वापरल्या जातात, असे सांगत डॉ. आपटे यांनी साधारण ५० औषधी वनस्पतींची माहिती दिली.
या दरम्यान १५० औषधी वनस्पतीचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते.
www.konkantoday.com