रत्नागिरी युवा सेनेकडून ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द
खेड : रत्नागिरी जिल्हा युवा सेनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला.
राज्य सध्या अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे. एकामागून एक संकटे येत आहेत. कोरोनाची भिती डोक्यावर असतानाच तौक्ते वादळाने कोकणाला जोरदार तडाखा दिला आहे. या वादळामुळे कोकणाची करोडोंची हानी झाली आहे.
तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आज कोकण दौऱ्यावर आले होते. रत्नागिरी येथे युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी त्यांची भेट घेऊन सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत गुहागर-खेडचे आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com