
म्हाडाच्या ९०४८ इमारतींचे सर्वेक्षण, त्यामध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याचा दावा
म्हाडाने मान्सूनपूर्व तयारी जोरात केली असून पावसाळ्यात इमारती कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच धोकादायक इमारतींचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत तब्बल ९०४८ इमारतींचे सर्वेक्षण केले असून त्यामध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे म्हाडाच्या इमारतींमध्ये काही अपघात झाल्यास सबंधितांना तत्काळ मदत मिळावी म्हणून नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. संक्रमण शिबिरे राखीव ठेवली आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
www.komkantoday.com