
कोकणातील हापूस आंबा आता कोकण रेल्वे मार्गाने देशभरातील मोठ्या शहरामध्ये
.कोकणातील हापूस आंबा आता कोकण रेल्वे मार्गाने देशभरातील मोठ्या शहरामध्ये रेल्वेने पोचवला जाणार आहे. यासाठी कोकण रेल्वेने एका बैठकचे आयोजन केले आहे. ही बैठक कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात होणार आहे. तर कोकणातील हापूस आंबा इतर भागात जावा यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून आता मँगो स्पेशल ट्रेन धावणार आहे. यातून फक्त कोकणातील आंबा वाहतूक केली जाणार आहे. अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली आहे.
कोकणातून आता थेट मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये हापूस आंब्याच्या या मँगो स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून वाहतूक करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. यासाठी उद्या कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागायतदार, वाहतूकदार आणि कोकण रेल्वे यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिल 2022 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि रत्नागिरीमधून थेट आंबा पार्सल कसा नेऊ शकतो याबाबत चर्चा होणार आहे. मँगो स्पेशल ट्रेन चालवण्यासाठी या बैठकीमध्ये विचारविनिमय होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस रेल्वे स्थानकात उद्या सायंकाळी 4 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत आंबा बागायतदार, व्यापारी आणि वाहतूकदार यांनी उपस्थित रहावे असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे. बैठकीचे आयोजन कोकण रेल्वेने केले आहे.