
चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्गाला नदीचे स्वरूप -महंमद रखांगी
मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रचंड त्रास बाजारपेठेला होत आहे. या वर्षी पूर्णतः गटारे बुजल्याने संपूर्ण बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसणार आहे. मुळात बाजारपेठेतील दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच गायब झाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते. यावरून येथील बिकट परिस्थितीची कल्पना येते, अशी माहिती महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख महंमद रखांगी यांनी दिली.
www.konkantoday.com