
लोटे औद्योगिक वसाहतीतील गावठी दारुचे गुत्ते ठरतायत कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होण्यास या परिसरातील गावठीदारूच्या गुत्त्यांवर तळीरामांची होणारी गर्दी कारणीभूत असल्याचे विदारक सत्य उघडकीस आले असल्यानेखळबळ उडाली आहे. या परिसरात पोलीस दुरक्षेत्र असतानाही गावठी दारूचे गुत्ते सुरुच कसे राहतात?
स्थानिक पोलिसांना या बाबत काहीच माहिती नाही का? की माहिती असून कानाडोळा केला जात आहे याची
वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे.खेडमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. प्रतिदिनी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रात तर कोरोनाच संसर्ग झपाट्याने वाढत आहे.येथील अनेक कारखान्यातील कामगार कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. या परिसरात आढळूनयेणाऱ्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या औद्योगिक वसाहतीत सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीच्यासहकार्याने कोविड सेंटरही सुरु करण्यात आले आहे.लोटे आद्यौगिक वसाहतीत एकाएकी कोरोनाबाधितांचीसंख्या का वाढते आहे याचा शोध घेतला असता समोर आले आहे. या परिसरात असलेल्या गावठी दारुच्यागुत्थावर होणारी तळीरामांची गर्दी कोरोना संसर्ग पसरवण्याला कारणीभूत ठरत आहे. या परिसरातील एक दोननव्हे तर तीन गावठी दारुचे गुत्ते आहे. दोन गुत्त्यांवर गावठी दारुबरोबर देशी-विदेशी दारुही विकली जाते. गेलीअनेक वर्षे हे बिनबोभाटपणे सुरु आहे.
या औद्योगिक वसाहतीत ठेकेदार पद्धतीने काम करणारे कामगार हे बहुतांशी परप्रांतिय आहेत. सायंकाळी सुट्टी झाली की दिवसभराच्या कामाचा शिण घालविण्यासाठी हे कामगार स्वस्त्यात मिळणाऱ्या गावठी दारुचे गुत्तेगाठतात. या गुत्यांवर दहा ते १५ जण एकत्र बसून दारु ढोसत असतात. यावेळी कुणाच्याही तोंडाला मास्कहीनसतो आणि सामाजिक अंतरही पाळण्याचे कुणाला भान नसते. त्यामुळे हे गावठी दारुचे गुत्ते कोरोनाचे केंद्रबिंदूठरू लागले आहेत.आठ दिवसापुर्वी गुन्हे अन्वेषण विभागाने या परिसरातील एका गावठी दारुच्या गुत्त्यावर धाडटाकून हा गुत्ता उद्धवस्त केला होता. खरतर रत्नागिरी येथून येऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी ज्यादारूच्या गुत्त्यावर धाड टाकतात तो गुत्ता स्थानिक पोलीस किंवा उत्पादन शुल्क विभागाने उद्धवस्त करणेअपेक्षीत आहे मात्र तसे न झाल्याने कोरोनाचे केंद्र बिंदू ठरणारे गावठी दारुचे गुत्ते स्थानिक पोलिसांना माहितनाहीत का? की माहीत असून कानाडोळा तर केला जात नाही ना! अशी शंका यायला वाव आहे.काही
महिन्यांपुर्वी खेड पोलीस स्थानकाचा चार्ज घेतलेल्या पोलीस निरिक्षक निशा जाधव या लेडी सिंगम अधिकारी
म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे त्या चालू देणार नाहीत याची खेडवासियांना कल्पना
आहे. कदाचीत लोटे औद्योगिक क्षेत्रातील या कोसेना केंद्रबिंदूच्या गावठी दारूच्या गुत्त्यांची माहीत अद्यापत्यांच्यापर्यंत पोहचली नसावी. पण आता गुन्हे अन्वेषण विभागाने केलेली कारवाई आणि माध्यमांनी याबाबतउठवलेला आवाज त्यांच्यापर्यंत नक्की पोहचेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
www.konkantoday.com