लसीकरणात प्राधान्य नाही केमिस्ट असोसिएशनचे नाराजी
औषध विक्रेता व तेथील कर्मचारी हे आपल्या जीवावर उदार होऊन चोवीस तास सेवा देत आहेत त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत चालू राहण्यास मोठी मदत झाली आहे औषध विक्रेत्यांच्या संबंध कोरोना रुग्ण अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची जवळून येतो महाराष्ट्रासह देशात दोनशेपेक्षा अधिक औषध विक्रेते करोनाचे बळी पडले असून एक हजाराच्या जवळपास परिवारातील व नातेवाईक बाधित झाले आहेत असे असूनही केंद्र सरकार व राज्य सरकारने औषध विक्रेत्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु लसीकरणात देखील प्राधान्य देण्याचे औदार्य दाखवलेले नाही
www.konkantoday.com