
मुलगी आपल्यापासून दूर जाईल, या नैराश्येतून कुवारबाव येथील रोहित चव्हाण याने आपल्या पत्नीचा खून करून आपले जीवन संपविले
रत्नागिरी : पत्नीला घटस्फोट हवा होता. तिने घटस्फोट घेतला तर मुलगी आपल्यापासून दूर जाईल, या नैराश्येतून कुवारबाव येथील रोहित चव्हाण याने आपल्या पत्नीचा खून केला आणि नंतर स्वत:लाही संपवले. रोहितची जी चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे, त्यातून या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
शहरानजीकच्या कुवारबाव येथे मंगळवारी पहाटे पती-पत्नीचे मृतदेह घरात सापडले होते. पत्नीचा मृतदेह बेडवर तर पतीचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत घरात एक चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये मी तिला मारले व स्वत:ला संपवत आहे, असे लिहिले होते. या चिठ्ठीतून आपल्या आईला मुलीचा सांभाळ करण्याची विनंतीही केली आहे.
www.konkantoday.com