नळपाणी योजनेच्या कामाच्या नावाखाली शहरात विविध भागात रस्त्यांची खोदाई, कंत्राटदाराच्या कामावर नगरपरिषदेची देखरेख नाही?
रत्नागिरी शहरवासीयांना नव्या पाण्याच्या योजने द्वारे पाणी मिळणार असल्याचे नगर परिषदेने जाहीर करून अनेक ठिकाणी नव्या पाणी योजनेसाठी शहरातील विविध भागात रस्त्यांची खोदाई करून ठेवली आहे.रत्नागिरी शहरातील गोडबोले स्टॉप जवळ महिन्यापेक्षा जास्त दिवस रस्ता खणून ठेवलेला आहे.ह्या रस्त्यावरून उद्यमनगर महिला कोविड सेंटर आणि उद्यमनगर कडे जाताना एक साईड बंद झाल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास होतो आहे .अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत मात्र कामे पूर्ण न झाल्याने ते अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे कंत्राटदार करीत असलेल्या कामावर नगरपरिषद अधिकाऱ्यांची देखरेख आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.
www.konkantoday.com