
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली
कोरोनाबाधित रुग्णांचे एअरोसोल्स 10 मीटर दूरवर हवेत पसरू शकतात, तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत पसरू शकतात. कोरोनाबाधित व्यक्तीची लाळ आणि नाकातून शिंकेद्वारे बाहेर पडणारे थेंब श्वास घेताना अथवा बोलताना, गाताना, हसताना, खोकताना बाहेर पडल्यामुळे कोरोना व्हायरसचे वाढते. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तीकडून देखील कोरोना व्हायरसचा फैलाव होतो. हे ध्यानात ठेऊन लोकांनी मास्क वापरणे चालू ठेवावे, एकावर एक असे दोन मास्क किंवा एन 95 मास्कचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे.
www.konkantoday.com