कोरोना रुग्णांसाठी रक्तदान करून मेमन समाजाचा मदत कार्यात असाही सहभाग,चिपळूण यंग मेमन बॉईज तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
मेमन यंग बॉईज चिपळूण* व अपरांत हॉस्पिटल, चिपळूण* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन बुधवारी स.१०. वा अपरांत हॉस्पिटल चे डायरेक्टर,चिपळूण मधील प्रसिद्ध डॉ.विजय रिळकर व मेमन समाज मधील प्रसिद्ध उद्योजग व डॉ. यासीन रंगूनवाला यांच्या हस्ते झाले.या वेळी अपरांत हॉस्पिटल चे मुख्य डायरेक्टर डॉ.यतीन जाधव, डॉ.सद्गुरू पाटणकर,डॉ.गौतम कुलकर्णी, राजेश दांडेकर, अमर भोसले, व मेमन समाजातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेमन यंग बॉईज संघटना चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला शहरातील मेमन समाज व इतर नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला भोगाळे येथील अपरांत हॉस्पिटल येथे आयोजित रक्तदान शिबिरात ४२ जणांनी रक्तदान करून कोविड रुग्णांना एक प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे,या शिबिरामध्ये संकलित केले जाणारे रक्त
डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात संग्रही ठेवले जाणार असून आवश्यकता असेल अशा रुग्णांना दिले जाणार आहे.
या वेळी अपरांत हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. यतिन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की
मेमन समाज हे अतिशय सभ्य, कष्टाळू व व्यापारी तत्त्वावर चालणारं समाज आहे. मेमन समाज नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी तयार असतं. त्याचंच उदाहरण म्हणजे आज चे आयोजित केलेले कॅम्प आहे. तसच पुढे ही अश्या प्रकारचे विविध सामाजिक काम करण्यासाठी त्यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
सध्या सर्वत्र कोरोना या जीवघेण्या विषाणू ने हाहाकार माजविला आहे, या काळात आपल्या जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत,आपल्या जिल्ह्यातील बंधू भगिनीना उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये या सामाजिक पवन जाणिवेतून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती मेमन समाज युवकांनी दिली या वेळी अपरांत हॉस्पिटल आणि वालावलकर रुग्णालय येथून आलेल्या डॉक्टर आणि त्यांच्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांचे तसेच रक्तदान करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले,संपूर्ण रक्तदान शिबिरात मेमन समाजातील लोकांतर्फे सोशल डिस्टनसिंग चे कडेकोट पालन करण्यात येत होते, संपूर्ण शिबीर नियोजन बद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आली होती रक्तदात्यांना क्रमाने फोन करून बोलावण्यात येत होते अपरांत हॉस्पिटल आणि वालावलकर रुग्णालय यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी चिपळूण यंग बॉईस संघटनेच्या युवकांनी विशेष मेहनत घेतली.
www.konkantoday.com