काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचं झालंय-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी खेड इथं पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलं. हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून मिळालीच नाही, आता तरी मदत मिळावी, असं फडणवीस म्हणाले.सलग दुसऱ्या वर्षी हा दौरा आहे. कोकणाचं मोठं नुकसान झालंय, मात्र गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचं झालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
www.konkantoday.com