
उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे – भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे
@meneeleshnrane
उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे. असा सणसणीत टोला भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज tweet करुन मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे करत आहेत. देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई -पास काढला आहे का?असा कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आक्षेप घेतला आहे
त्यांच्या दौऱ्यात नियमांचे उल्लंघन होते आहे. फडणवीस यांनी फिरण्यासाठी ई-पास काढलाय का? अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिवांकडे काळे यांनी मागितली आहे.यावर उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे. असा खोचक टोला निलेश राणे यांनी महाविकासला लगावला आहे.
www.konkantoday.com




