
बुडालेल्या मच्छीमार नौकेवरील दुसर्या खलाशाचा मृतदेह सापडला
दापोली तालुक्यात केळशी येथे समुद्रात बुडालेल्या मच्छीमार नौकेतील सहापैकी दोन खलाशांचा मृत्यू झाला. शाहदत इब्राहिम बोरकर (55) तसेच गनी इस्माईल खमसे (50) अशी मृतांची नावे आहेत.
या दुर्घटनेत बुडून बेपत्ता झालेल्या खलाशांपैकी शाहदत बोरकर या एका खलाशाचा मृतदेह किनारा मोहल्ला परिसराजवळ आढळला तर दुसर्या बेपत्ता खलाशासाठी शोधकार्य सुरू असताना सायंकाळी उशिरा त्याचाही मृतदेह हाती लागला
www.konkantoday.com