रेमडेसिवीर इंजेक्शनही करोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची दाट शक्यता
करोना रुग्णावर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने करोना उपचाराच्या यादीतून वगळली. प्लाझ्मा थेरपीबरोबरच आता सर्वात जास्त मागणी होत असलेलं रेमडेसिवीर इंजेक्शनही करोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. करोना रुग्णांवर रेमडेसिवीर वापरामुळे चांगले परिणाम होत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं सांगत त्यांनी हे इंजेक्शन लवकरच यादीतून वगळले जाण्याचे सुतोवाच दिले आहेत.
www.konkantoday.com