मान्सूनच्या पावसाचे ८जूनपर्यंत कोकणात आगमन होण्याचा अंदाज
कोकण किनारपट्टी आणि मुंबईला झोडपून काढणाऱ्या तौक्ते चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल सुकर झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मान्सून नेहमीपेक्षा आधीच भारतात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार, येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होईल. त्यानंतर केरळमार्गे प्रवास करत मान्सूनच्या पावसाचे ८जूनपर्यंत कोकणात आगमन होईल, असा अंदाज आहे
www.konkantoday.com