नळपाणी योजनेसाठी पाडलेले चर योग्य रीतीने न बुजवल्याने घाईघाईत काम केल्याने डंपर फसला
वादळ व पावसाची शक्यता असताना सुद्धा नवीन रस्त्याची कामे सुरु करून नळपाणी योजनेसाठी पाडलेले चर योग्य रीतीने न बुजवता घाईघाईत त्यावरच नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले परंतु प्रशासनानचे त्याकडे कोणतेही लक्ष नाही किंवा त्यावर कोणाचाही अंकुश नाही त्यामुळे सबब दोन दिवसापूर्वी केलेला नवीन रस्ता असून त्यामध्ये जोशी पाळंद येथे शिवाजी हायस्कूल समोर रस्ते करणाऱ्यांचा डंपर अडकून पडला आहे आता तरी नगरपालिकेला जाग येऊन त्यावर माननीय जिल्हाधिकारी किंवा मंत्रीमहोदय अंकुश ठेवतील का ? अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे किंवा सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल करत असलेले विविध प्रकारचे कर / टॅक्स असंच फुकट जातील का ? अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे
www.konkantoday.com