
तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी हापूसला,सुमारे चाळीस टक्के पिक वाया
तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी हापूसला बसला आहे. यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच आलेल्या वादळासह मुसळधार पावसाने झाडावरील आंबा खाली पडला. सुमारे चाळीस टक्के पिक वाया गेले असून बागायतदारांचे करोडोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे
यंदा आंब्याला मोहोर उशिराने आल्याने १५ ते ३१ मे या कालावधीत जास्त उत्पादन हाती येईल अशी शक्यता होती; मात्र या वादळाने नुकसान झाले. शिवाय, लागती झाडेच मोडल्याने शेतकरी उत्पन्नाला मुकला आहे.
www.konkantoday.com