
कर्ला गावातील आजोबांनी जीवाचा कोट करुन आपल्या पाच वर्षांच्या नातवाचे प्राण वाचवले
ताैक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर थैमान घातलं हाेते. या वादळामुळे रत्नागिरी जवळच्या कर्ला गावातील अशोक कळंबटे कुटुंबावर कठीण प्रसंग ओढावला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावर तब्बल दोन भली मोठी झाडं कोसळली. परंतु आजोबांनी जीवाचा कोट करुन आपल्या पाच वर्षांच्या नातवाचे प्राण वाचवले. अशोक कळंबटे यांच्या बहादुरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळा मुळे कळबंटे कुटुंब आपल्या कर्ला येथील घरात थांबलेले होते या प्रसंगाबद्दल बोलताना अशोक कळंबटे यांनी सांगितले की बाहेर जोरदार वारे सुटले होते घरासमोरील मोठं झाड कोसळून आमच्या घरावर पडलं होतं. घराचे पत्रे फुटत होते. माझे डोळे माझा नातू वेदांतला शोधत होते. तोच वेदांत माझ्या नजरेला पडला. वरुन पत्रे कोसळत होते. वेदांत पत्रे कोसळत असलेल्या खोलीकडे जात होता. मी त्याला क्षणाचाही विलंब न लावता मागे खेचलं आणि त्याला पोटाखाली घेतलं. माझ्या पाठीवर पत्रे पडले. मला मार लागला पण, माझा नातू सुखरुप असल्याचं समाधान होतं.असे अशोक कळंबटे यांनी सांगितले
www.konkantoday.com