रत्नागिरी शहरात आरोग्य मंदिर येथे रिक्षा व दुचाकी अपघात, सहा जण जखमी


रत्नागिरी शहरात आरोग्य मंदिर येथे रिक्षा व दुचाकी अपघात झाला या अपघातात, सहा जण जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आरोग्य मंदिर येथे रिक्षा आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला .अपघातात रिक्षाचालक अजित अरविंद वाडकर ( कारवांचीवाडी, रत्नागिरी), विनोद शंकर धनावडे (रा. वाटद खंडाळा, ता. रत्नागिरी), तेजस विनोद धनावडे (12, रा. वाटद खंडाळा, ता. रत्नागिरी) आणि कार्तिक किरण घेवडे (18, रा. फुणगूस, संगमेश्वर) हे रिक्षातील जखमी झाले आहेत. तर दुचाकीवरील अजमल खालिद मजगांवकर (19, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) आणि सलमान सुलेमान दर्वे (18, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद पोलीस स्थानकात झाली आहे अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button