
आपदग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : काँग्रेस नेत्या सौ.हुस्नबानू खलिफे
तौक्ते चकीवादळामुळे राजापूर तालुक्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या नुकसानीची माजी आमदार व काँग्रेस नेत्या सौ.हुस्नबानू खलिफे यांनी सोमवारी पाहणी केली.
तौक्ते चकीवादळाने कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा दिला. वादळी वारे आणि पाऊस यामूळे तालुक्यातील किनारपट्टीवरील आंबोळगड, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ परिसरातील गावांमध्ये मोठी पडझड झाली. अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडली, तसेच वाऱयामुळे कौले, पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. चकीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सौ.खलिफे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली.
www.konkantoday.com