सध्या चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून १२० किमी अंतरावर येऊन ठेपलं
तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, . याचदरम्यान आणखी एक चिंतेत भर करणारी माहिती समोर येत आहे.
सकाळी ११.३० पर्यंत तौक्ते चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून १५० किमी समुद्री भागात होतं. मात्र आता ते आणखी जवळ येत आहे. सध्या चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून १२० किमी अंतरावर येऊन ठेपलं, असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे सकाळी ११ वाजेपर्यंत १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहात होते.
www.konkantoday.com