
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन कोविड19 या साथीच्या कठीण काळात सरकारी रुग्णालयांना पाठिंबा
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकत सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीला 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी स्वरूपात देण्यात आले. सध्या देशभरात ऑक्सिजन वायूची कमतरता आणि कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी देऊन सिव्हिल हॉस्पिटलला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आले आहे . याचाच एक भाग म्हणून दि . १४ मे रोजी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त केले. याचा सरकारी रुग्णालयांना चांगला फायदा होणार आहे.
यापूर्वी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने जिल्हा प्रशासनाला कोविड काळात 16 सुसज्ज आयसीयू बेड ,सलाईन स्टँड, मल्टीपारा मॉनिटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स आणि HFNO मशीन दिले आहेत.
मा.जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कोविड १९ या परिस्थितीत निरंतर पाठिंबा दिल्याबद्दल मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्थ सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांचे आभार मानले.
www.konkantoday.com