
कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक -तज्ज्ञांचे मत
कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात आता पावसाळा जवळ येत आहे. या काळात आर्द्रता अधिकच वाढते. त्यामुळे हा आजार अधिक बळावतो. त्यामुळे कोकणातील लोकांनी विशेषत: ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. श्वसननलिकेप्रमाणेच डोळ्यांवरही त्याचा परिणाम होत असल्याने त्याबाबत सजग राहण्याची वेळ आली आहे असे मत या विषयांतील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे
www.konkanyoday.com