केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या
देशातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खेड्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. केंद्राने सांगितलं की, आता हळूहळू पेरी-अर्बन, ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये कोरोनाचा संसर्ग होत आहे. गाईडलाईन्स जारी करत केंद्र सरकारने म्हटलंय की, कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी समुदायाला सक्षम करणे आणि सर्व स्तरावरील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांचे च्या मदतीने टेली- कन्सल्टेशन करण्यात यावे, तर गंभीर लक्षणं असलेल्या किंवा ऑक्सिजन लेव्हल कमी असणाऱ्या रुग्णांना मोठ्या सेंटरमध्ये पाठवले जावे. परिस्थितीनुसार, कॉन्टक्ट ट्रेसिंग करण्यात यावी. तसेच CHOs आणि ANM ना रॅपिड अँटिजन टेस्टिंग करण्याचे प्रशिक्षण दिले जावे. प्रत्येक गावाकडे पुरेसे पल्स ऑक्सिमिटर आणि थर्मोमिटर असणे आवश्यक आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेवीकेच्या मदतीने याचा वापर केला जावा. वापरानंतर याचे सॅनिटायझेशन केले जावे.
www.konkantoday.com